संभल हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या संभल ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. संभल उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात दिल्लीच्या १६० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली संभलची लोकसंख्या सुमारे 2 लाख होती. या ठिकाणाचे नाव सत्ययुगात सत्यव्रत, त्रेतामध्ये महादगिरी, द्वापरमध्ये पिंगल आणि कलियुगात संभल असे आहे. हे प्राचीन शहर एके काळी महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांची राजधानी देखील होते. बाबरच्या सेनापतींनी येथील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली होती आणि जैन मूर्तींची विट्ंबना केली होती. यासाठी अनेक हिंदू आणि जैन यांनी आपले प्राण वेचले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संभल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!