अयोध्या अयोध्या हे हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे. हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे. हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्राचे जन्मस्थान मानले जाते. राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला ( अवध ) हिंदूंसाठी सात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक ( सप्तपुरी ) मानले जाते . २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,५०,९९९ होती. सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले.
येथे भव्य राम मंदिर होते. ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे ते उध्वस्त केले गेले. आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशिद उभारली गेली. जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्षे शांततामार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे जिंकला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले.
अयोध्या
यामागील विज्ञान आणि इतिहास.