दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल (१९ मार्च १९१९ - १६ जुलै २००९) एक भारतीय कर्नाटक संगीतकार आणि तामिळ चित्रपटातील गायिका होत्या. त्यांच्या समकालीन एमएस सुब्बुलक्ष्मी आणि एम.एल. वसंतकुमारी यांना एकत्रितपणे अजूनही "कर्नाटिक संगीताची त्रिमुर्ती " म्हणून ओळखले जाते. या त्रिकुटाने कर्नाटक संगीतच्या मुख्य प्रवाहात महिलांच्या प्रवेशास सुरुवात केली. जगभरातल्या कर्नाटक संगीत प्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांना सरकार तर्फे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत जसे; संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६१), पद्मभूषण पुरस्कार (१९७१), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (१९९८) आणि कालिदास सन्मान पुरस्कार (१९९८-९९).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दमाल कृष्णस्वामी पट्टम्माल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.