दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२

दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने एकमेव महिला कसोटी सामना, तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जून-जुलै २०२२ दरम्यान इंग्लंडचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने २०१४ नंतर प्रथमच महिला कसोटी सामना खेळला. कसोटी सामन्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंड अ संघासोबत तीन-दिवसीय सराव सामना खेळला.

एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने एकूण ४ नवोदित खेळाडूंना संधी दिली तर दक्षिण आफ्रिकेच्या एकूण ९ खेळाडूंनी महिला कसोटीत पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना मेरिझॅन कॅप हिच्या १५० धावांच्या साथीने २८४ धावा केल्या. महिला कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना मेरिझॅनने केलेल्या १५० धावा या सर्वाधिक धावा होत्या, इंग्लंडने देखील नॅटली सायव्हर आणि ॲलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स या दोघींच्या शतकांमुळे ४१७ धावा केल्या. चौथ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात १८१ धावांवर असताना पावसाचा व्यत्यत आल्याने सामना अनिर्णित सुटला. इंग्लंडने महिला वनडे आणि ट्वेंटी२० मालिका दोन्ही अनुक्रमे ३-० आणि ३-० या फरकाने जिंकल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →