दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरू झालेल्या २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने फाफ डू प्लेसीला कसोटी तर क्विंटन डी कॉकला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पूर्वी रांचीत खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे पुण्याला हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी पुणे तर तिसरी कसोटी रांचीला खेळविण्यात येणार आहे.
ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.