दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला. या दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.
या मालिकेपासून, यापुढे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व मालिकांना महात्मा गांधी-नेल्सन मंडेला मालिका म्हणले जाईल. तसेच कसोटी मालिकेस फ्रिडम ट्रॉफी म्हणून संबोधित करण्यात येईल.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.