अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होती.
अफगाणिस्तानने पहिला एकदिवसीय सामना सहा गडी राखून जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर हा त्यांचा पहिला एकदिवसीय विजय होता. रहमानुल्लाह गुरबाझच्या १०५ धावा आणि रशीद खानच्या १९ धावांतील ५ बळींच्या जोरावर यजमानांनी दुसरा एकदिवसीय सामना १७७ धावांनी जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेवर पहिला मालिका विजय मिळवला. एडन मार्करामच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसरा एकदिवसीय सामना ७ गडी राखून जिंकला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५
थोडक्यात पण महत्त्वाचे.