आयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. कसोटी अबू धाबीमध्ये खेळली गेली आणि शारजाहमध्ये एकदिवसीय आणि टी२०आ सामने खेळले गेले. टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग बनली. कसोटीचे ठिकाण शेख झायेद क्रिकेट स्टेडियममधून टॉलरन्स ओव्हल येथे सामन्याच्या एक आठवडा आधी हलवण्यात आले.
आयर्लंडने कसोटी सामना सहा गडी राखून जिंकला. आठव्या प्रयत्नात आयर्लंडचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाल्याने अफगाणिस्तानने वनडे मालिका २-० ने जिंकली.
आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२३-२४
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.