अगदी इ.स.पू. काळापासून जगाच्या विविध भागात विविध कारणांवरून झालेल्या दंगलींच्या नोंदी आढळून येतात. इ.स.पू. ४४ मध्ये ज्यूलियस सिझरच्या अंत्यविधीनंतर दंगल झाल्याची नोंद आढळते. इ.स.पू. ४० मध्ये अलेक्झांड्रियात ग्रीक आणि ज्यू लोक तर इ.स. ५३२ मध्ये कांस्टटीनोपाल येथे मोठी मनुष्य हानीझालेल्या दंगलीची नोंद आढळते.
भारतातील दंगंलींचा इतिहास एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून दिसून येतो. सप्टेंबर, इ.स. १८६९ मध्ये नागपूर आणि आसपासच्या गावात धान्याच्या अनुपल्ब्धतेवरून आणि वाढत्या भावांच्या संदर्भाने दंगली झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८७५ मध्ये तेव्हाच्या पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सावकारांविरूद्ध दंगल केल्याची नोंद आढळते.
दंगलींचा इतिहास
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.