द फोर्टी टू (The 42) ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील निवासी गगनचुंबी इमारत आहे. ही इमारत शहराचा मध्यवर्ती व्यापारी केंद्र असलेल्या चौरंगी रोडवर आहे. टाटा सेंटरची व्यावसायिक इमारत आणि जीवन सुधाची निवासी इमारत यांच्यामध्ये ती स्थित आहे. २००८ मध्ये ती पहिल्यांदा प्रस्तावित करण्यात आली होती परंतु जवळपास दोन वर्षे बांधकामाला विलंब झाला. इमारतीचे बांधकाम २०१९ मध्ये पूर्ण झाले तेव्हा ती त्यावेळची देशातील सर्वात उंच इमारत होती.
ही इमारत मुंबईबाहेर भारतातील सर्वात उंच पूर्ण झालेली इमारत आहे. तसेच भारतातील १५ वी सर्वात उंच इमारत आहे.
द ४२ (कोलकाता)
या विषयावर तज्ञ बना.