द हिस्टरी ऑफ डुइंग

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

द हिस्टरी ऑफ डुइंग कर्तेपणाचा इतिहास या पुस्तकामध्ये राधाकुमार या स्त्रीवादी लेखिकेने स्त्री चळवळीचा विकास कसा होत गेला, स्त्री चळवळीचे टप्पे कोणकोणते होते. स्त्रीवादी सिद्धांतने कशा प्रकारे उभी राहत गेली एकूणच स्त्री चळवळ आणि स्त्रीवादी संघटना यांचा सखोल ऐतिहासिक दस्तऐवज या पुस्तकामधून समोर येतो.स्त्री चळवळीचा ऐतिहासिक दस्तऐवज राधाकुमार बारा प्रकरणामधून मांडत जातात. सुरुवातीलाच त्या वसाहत काळातील स्त्रियांचा सार्वजनिक अवकाश कशा प्रकारे सुधारणावादी विचार प्रवाहांच्या माध्यमातून उभा राहिला याचे विवेचन विस्तारित स्वरूपात देतात. यामध्ये 'शिक्षण' हा घटक कसा प्रभावी ठरला ते अनेक स्त्रियांच्या अभ्यासामधून मांडत जातात. उदा. पंडिता रमाबाई यांचा जीवनपट मांडून त्यांनी प्रस्थापित समाज व्यवस्थेला धर्मांतराच्या प्रक्रियेने हादरे बसविले याचे स्पष्टीकरण राधाकुमार देत जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →