द टाइम्स ऑफ इंडिया

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश: The Times of India) हे भारतामधील एक आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र आहे. २००८ सालामधील एका सर्वेक्षणानुसार रोजचा ३१.४ लाख खप असलेले टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वात लोकप्रिय इंग्लिश तर सर्व भाषीय वृत्तपत्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा असलेला टाइम्स १८३८ सालापासून अस्तित्वात आहे.

इतिहास

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची सुरुवात ३नोव्हेंबर,इ.स.१८३८ रोजी द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स या नावाने झाली.

आवृत्त्या

सध्याच्या घडीला टाइम्स ऑफ इंडिया भारतामधील खालील १४ प्रमुख शहरांमधून छापला जातो.

१ मुंबई

२ अहमदाबाद

३ बंगळुरु

४ भोपाळ

५ चंदीगढ

६ चेन्नई

७ दिल्ली

८ गोवा

९ हैदराबाद

१० जयपूर

११ कोची

१२ कोलकाता

१३ लखनौ

१४ पुणे

ह्याखेरीज टाइम्स ऑफ इंडियाचे ॲप आयफोन,आयपॅड,अँड्रॉईड,ब्लॅकबेरी,विंडोज फोन इत्यादी प्रमुख मोबाईल फोन प्रणालींवर उपलब्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →