त्रयोदशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवड्यात वद्य त्रयोदशी येते. प्रत्येक त्रयोदशीला शिवरात्री हे पर्व असते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात. त्रयोदशीला केलेल्या उपासाला प्रदोष हे नाव आहे.. दोन्ही पक्षांत येत असल्याने या दिवसाला पक्षप्रदोष म्हणतात. त्यांना वारानुसार सोमप्रदोष, भौमप्रदोष किंवा शनिप्रदोष ही नावे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रयोदशी
या विषयातील रहस्ये उलगडा.