त्बिलिसी (जॉर्जियन: თბილისი) ही जॉर्जिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जॉर्जियाच्या दक्षिण भागात कुरा नदीच्या काठावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे १५ लाख होती.
इ.स.च्या पाचव्या शतकात स्थापन झालेले त्बिलिसी गेल्या १००० वर्षांहून अधिक काळापासून जॉर्जियाचे राजधानीचे शहर राहिले आहे. रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना १८०१ ते १९१७ दरम्यान त्बिलिसी संपूर्ण कॉकेशस प्रदेशाची तर १९२० ते १९९१ दरम्यान जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.
सध्या त्बिलिसी हे जॉर्जियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून येथील लोकवस्ती बहुवर्णीय आहे.
त्बिलिसी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.