तुषार यशवंत घाडीगावकर (सप्टेंबर १८, २०२५ - जून २०, २०२५) हे एक मराठी अभिनेते होते. घाडीगावकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', 'हे मन बावरे' आणि 'संगीत बिबट आख्यान' यांसारख्या कामांसाठी ते ओळखले जातात.
घाडीगावकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील असून त्यांनी रुपारेल कॉलेजच्या नाट्य विभागात काम केले होते. त्यांचे बालपण मुंबई उपनगरातील भांडूप परिसरात गेले होते. ते भांडूप मधील हनुमान नगर येथे राहत होते. कॉलेजनंतर त्यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून अभिनयाचा प्रवास सुरू केला. २० जून २०२५ रोजी कामाच्या अपुऱ्या संधी आणि मानसिक दबावामुळे त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.
घाडीगावकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत त्यांनी काम केले आहे. 'लवंगी मिरची' ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली मालिका आहे, ज्यामध्ये त्यांनी काम केले आहे. 'मन कस्तुरी रे' हा त्यांचा चित्रपट आहे. याशिवाय त्यांनी नुकतेच सन मराठीवरील 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत काम केले होते. घंटा नाद प्रॉडक्शन द्वारे घाडीगावकर यांनी अनेक मालिका व लघुपटासाठी दिग्दर्शन केले होते. आमचा मोरया रे, सारलेला क्षण, भाऊचा धक्का, माझ्या गजानना, बाप्पा, खत आया है या संगीत ध्वनिफिती तसेच चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.
घाडीगावकर यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी त्यांची खास मैत्रीण सिद्धी सोबत लग्न केले होते. शुक्रवारी सिद्धी बाहेर कामावर गेली असताना त्यांनी दुपारच्यावेळेस पंख्याला लटकावून घेऊन आत्महत्या केली.
तुषार घाडीगावकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.