घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा उपलब्ध साहित्य (विटा, फरशी) वापरून बनवलेल्या तुळशीचे रोप लावायच्या कुंडीला तुळशी वृंदावन म्हणतात. अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते. घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्रसंकेत मानला जातो. काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते. नवीन वास्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुळशी वृंदावन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.