तिग्मांशु धूलिया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तिग्मांशु धूलिया

तिग्मांशु धूलिया (जन्म ३ जुलै १९६७) हा एक भारतीय चित्रपट संवाद-लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा-लेखक, निर्माता आणि कास्टिंग दिग्दर्शक आहे जो हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणीमधील त्याच्या कामांसाठी ओळखला जातो. १९९८ मध्ये आलेल्या दिल से.. या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लिहिले होते जो यूके टॉप टेनमध्ये आलेला पहिला बॉलिवूड चित्रपट आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता. २०१० बिएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या पान सिंग तोमर या चरित्रात्मक चित्रपटाद्वारे त्याच्या दिग्दर्शन कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. पान सिंग तोमरने २०१२ मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. तो रोमांचक नाट्य चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर साठी पण नावाजला आहे. त्याचप्रमाणे त्याचा सिक्वेल चित्रपट साहेब, बीवी और गँगस्टर रिटर्न्सने समीक्षकांची प्रशंसा मिळवली होती.

अनुराग कश्यपच्या गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटातील रामधीर सिंग या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध आहे. धुलियाने राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून नातकामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →