तर्कांतील त्रुटींमुळे मूलतः उणीववयुक्त निष्कर्षांचा आभास होतो. तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचित हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतु तार्किक उणीवांची निर्मिती, श्रोत्यास, वाचकास फसवण्यासाठी हेतुत: अथवा दुष्टपणातूनच झाली असेलच असे नाही. युक्तिवादाच्या मुळाशी असलेली गृहीते चिकित्सक दृष्टीने अभ्यासण्यात तपासण्यात झालेल्या गफलतींमुळे एखादे गृहीत तत्त्व विचारात घ्यावयाचे राहून गेल्याने अथवा गृहीतांना योग्य त्या प्रमाणांत लक्षात घेणे राहिल्यामुळे, अथवा अनवधानानेसुद्धा
तार्किक त्रुटी आणि उणीवा निर्माण होतात.
तार्किक उणीवांमधील दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क, वरकरणी सत्याचा आभास निर्माण करण्यात आणि त्यावर आधारित श्रद्धा वा विश्वास निर्माण करत मने वळवण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वीसुद्धा होताना दिसतात. हेतुत: असो नसो, श्रोता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर फसतातसुद्धा.
स्पष्ट आणि चपखल शब्दांची निवड अथवा युक्तिवादाचे समर्थन करण्याकरीता पार्श्वभूमिका सबळपणे मांडण्यात आलेल्या अपयशानेसुद्धा तार्किक उणीवांची निर्मिती होऊ शकते. तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क केवळ युक्तिवाद मांडणाऱ्या व्यक्तीची मांडणी क्षमतेची मर्यादा असू शकतात.. तर्कदोषांनी दुबळे झालेल्या युक्तिवादाने समर्थनाचा प्रयत्न झालेले निष्कर्ष कदाचित, मूलत: सत्यही असू शकते.
तार्किक उणीवा
या विषयावर तज्ञ बना.