तांडव (दूरचित्रवाणी मालिका)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

तांडव ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवरील एक भारतीय राजकीय रोमांचक दूरचित्रवाणी मालिका आहे, जी अली अब्बास जफर यांनी तयार केली, दिग्दर्शित केली आणि निर्मिती केली व गौरव सोलंकी यांनी पटकठा लिहिली आहे. या मालिकेत सैफ अली खान, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशु धुलिया, डिंपल कपाडिया, मोहम्मद झीशान अय्युब, दिनो मोरिया आणि अनुप सोनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका भारतीय राजकारणाच्या काळ्या छटां बद्दल आहे, जिथे सत्तेसाठी कोणत्याही टोकाला जाणारे लोक दाखवले आहे.

तांडवचे मुख्य चित्रीकरण ऑक्टोबर २०१९ मध्ये सुरू झाले, आणि बहुतेक हरियाणा आणि दिल्लीतील पतौडी पॅलेसमध्ये झाले. या मालिकेचे छायांकन कॅरोल स्टॅडनिक यांनी केले आहे आणि स्टीव्हन एच. बर्नार्ड यांनी संपादित केले आहे; पार्श्वसंगीत ज्युलियस पॅकियम यांनी तयार केला आहे. या मालिकेचे प्रसारण १५ जानेवारी २०२१ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →