आदिपुरुष हा आगामी भारतीय हिंदू पौराणिक चित्रपट रामायण या हिंदू महाकाव्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे आणि टी-सीरीज फिल्म्स आणि रेट्रोफिल्स यांची ही संयुक्त निर्मती आहे. या चित्रपटाचे मुख्य निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर आहेत. हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये एकाच वेळी शूट करण्यात आलेल्या या चित्रपटात श्रीरामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सॅनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहेत. ५०० कोटी (US$१११ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनलेला, आदिपुरुष हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये शूटिंगच्या समाप्तीची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये 3D आणि आयमॅक्स या मानक स्वरूपात प्रदर्शित होणार आहे.
आदिपुरुष
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!