तलाक

या विषयावर तज्ञ बना.

तलाक हा इस्लाममधील विवाहविच्छेद (घटस्फोट, काडीमोड) होय. तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार केला की तलाक झाला असे समजले जाते. पण अशा पद्धतीने दिलेला तलाक प्रेषितांना पसंत नव्हता. हा तिहेरी तलाक (ट्रिपल तलाक) टेलिफोनवरून किंवा 'व्हाॅट्सअप'सारख्या मीडियावरूनही देता येत नाही.

धर्मानुसार, तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक सुरू करू शकतात. प्रत्यक्षात फक्त पुरुष तलाक देताना आढळतात.

तलाकचे मुख्य पारंपरिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेऊन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन शरिया तथा पारंपरिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर प्रक्रियेपेक्षा वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, तलाक देण्याची वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याच्या संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते.

तलाक दिल्यानंतर चार महिने दहा दिवसानंतर स्त्री स्वतःच्या मर्जीने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करू शकते . पण तोदेखील मेला किंवा त्यानेही तलाक देऊन टाकला तर पुन्हा चार महिने दहा दिवसानंतर तिला जर वाटलं कि , आपला पूर्वाश्रमीचा नवराच बरा होता , आपण त्याच्यासोबतच परत संसार वसविला पाहिजे , तर दोघांच्या सहमतीने ते दोघे जर परत लग्न करत असतील, तर या प्रक्रियेला हलाला म्हणतात . सगळं आधीच ठरवून असे तलाक , दुसरे लग्न आणि परत तलाक आणि परत पाहिल्याशी लग्न करणे, हा हलाला नसून हरामा आहे आणि तो हराम आहे . अशा प्रकाराचा प्रेषितांनी धिक्कार केलेला आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →