ढोकळा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ढोकळा

ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो.

ढोकळा सकाळी नाश्त्याच्या वेळेपासून अगदी जेवणाप्रमाणे सुद्धा खाल्ला जातो. ढोकळा हा खमण नावाने सुद्धा ओळखला जातो. दोन्ही नावे वापरली जातात.

तांदूळ आणि चण्याची डाळ एका ठराविक प्रमाणात (ठराविक चव आणि पोत येण्यासाठी) रात्रभर भिजवले जातात. हे मिश्रण दळून चार ते पाच तास किंवा रात्रभर आंबण्यासाठी ऊबदार ठिकाणी ठेवले जाते. त्यात थोडा तिखटपणा येण्यासाठी थोडी मिरचीची पूड, कोथिंबीर, आलं आणि बेकिंग सोडा घातला जातो. हे आंबवलेले मिश्रण मग एका पसरट भांड्यात ओतून १५ मिनिटे वाफवले जाते आणि त्याचे तुकडे कापले जातात. या कापलेल्या तुकड्याना गरम तेल आणि मोहरीची फोडणी दिली जाते. हिंग आणि गरम तेलात तळलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा वापरल्या जातात किंवा सम प्रमाणात पाणी आणि साखर तेलात टाकली जाते. हे तुकडे मग भांड्यातून काढले जातात. कधी कधी ते गरम तेलात जिऱ्याची फोडणी करून त्यात परतले जातात. बरेचदा ढोकळा तळलेल्या मिरच्या आणि कोथिंबिरीच्या चटणीसोबत वाढला जातो. ते कोथिंबिरीने अथवा कधीतरी किसलेले खोबरे वापरून सजविले जातात.

आंबवलेले मिश्रण वाफवण्यासाठी अजून एक पद्धत वापरली जाते, ज्यात मिश्रण पसरट भांड्यात ओतून ते भांडे अजून एका वाफ बाहेर न जाऊ देणाऱ्या भांड्यात ठेवले जाते. ढोकळा वाफवताना वाफेचे पाणी त्यावर पडू नये म्हणून झाकणाला पातळ कापड बांधले जाते.

ढोकळ्याचे प्रकार :

आंबट (खट्टा) ढोकळा

रसिया ढोकळा

खांडवी

तूर डाळीचा ढोकळा

रवा ढोकळा

हिरव्या वाटाण्याचा ढोकळा

वेगवेगळ्या डाळींचा ढोकळा

खमण हा असाच काहीसा डाळीच्या पिठाचा पदार्थ तर ढोकळा हा तांदूळ आणि चणाडाळ वापरून बनवला जातो. खमण साठी फक्त चणाडाळ वापरली जाते.खमण रंगाने रंगाने थोडा फिकट आणि ढोकळ्यापेक्षा जास्त मऊ असतो. ढोकळा बनवताना अगदी थोड्या प्रमाणात सोडा वापरतात. पण खमण अधिक मऊ आणि जाळीदार होण्यासाठी जास्त बेकिंग सोडा वापरला जातो.

टीप:- सॉस किवा चिंचेची चटणी सोबत खावे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →