पाट्रोडे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पाट्रोडे

पाट्रोडे हा एक मुळ भारतीय खाद्यपदार्थ आहे. त्याची अनेक नावे आहेत. त्याला पत्र, पाथ्रोडो, पाथ्रोडे, पाथ्राडो, पातोडे, टींपा, वडया, अळुवडी, या नावाने भारतीय विविध भाषेतील लोक म्हणतात. महाराष्ट्रात त्याला अळू वडी म्हणतात.

अळू वडी हा महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाचे मालवण भागातील खाध्य पदार्थ आहे. तांदळाचे पीठ आणि आवडणारे मसाल्याचे पदार्थ ( हळद मीठ, जिरे, लवंग, तिखट, साखर वगैरे ) एकत्रित करून अळुचे पान पसरून त्यात हे सारण भरतात. त्याचे वेटोळे करतात आणि वाफवतात.

कोंकण भागात अळूचे पान दुमडून व घडी घालून ते वाफऊन करतात. इतर विभागात हे वाफऊन झाल्यानंतर त्याचे लहान लहान तुकडे करतात आणि ते तळून घेतात त्यावेळी ती डिश खाण्यासाठी तयार होते. पाट्रोड या शब्दात खरे तर दोन शब्द आहेत. एक ‘पत्र’ आणि ‘वडे’। पत्र म्हणजे अनेक भारतीय भाषेत पान, आणि वडे म्हणजे सारण भरून बुजविणे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →