डोरिस अँडरसन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डोरिस हिल्डा अँडरसन (१० नोव्हेंबर १९२१ ते २ मार्च २००७) ही एक कॅनेडियन लेखिका, पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्ती होती. ती चॅटेलीन नावाच्या महिला मासिकाची संपादीका होती. तिच्या लेखणातून ती पारंपारिक सामग्री (रेसिपी, डेकोर) आणि त्या दिवसातील काटेरी सामाजिक समस्या (स्त्रियांवरील हिंसाचार, वेतन समानता, गर्भपात, वंश, गरिबी) यांचे मिश्रण करून मासिकाच्या अग्रभागी ठेवत होती. कॅनडामधील स्त्रीवादी चळवळीची ती समर्थक होती. नियतकालिकाच्या पलीकडे जाऊन तिने सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्यास मदत केली. कॅनडाच्या संविधानात महिलांची समानता निश्चित केली. यामुळे तिचे नाव कॅनडातील महिला चळवळीतील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक नाव झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →