जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो.
अँडरसन क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. याने जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक तर एकूण गोलंदाजांमध्ये (मुतिया मुरलीधरन नंतर) दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.
फेब्रुवारी २०२३मध्ये हा आयसीसी गोलंदाज क्रमवारीत हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी त्याने सर्वाधिक वयाच्या गोलंदाजाने पहिला क्रमांक मिळविण्याचा विक्रम रचला. २०२४मध्ये निवृत्तीच्या आधी अँडरसन ७व्या क्रमांकावर होता. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळलेल्या मोजक्या जलदगती गोलंदाजांत अँडरसन एक आहे.
अँडरसन आपला पहिला कसोटी सामना २००३मध्ये आणि शेवटचा २०२४मध्ये खेळला. हा इंग्लंडकडून २००२-१५ दरम्यान एकदिवसीय आणि २००७-०९ दरम्यान टी२० सामने खेळला.. २०१८मध्ये इंग्लंडच्या १,०००व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्वोत्तम संघामध्ये त्याची निवड केली होती.
अँडरसन जलदगती गोलंदाजांमध्ये कसोट्यांमधून सर्वाधिक बळी (७०४) घेणारा आहे. हा ६०० आणि ७०० बळी घेणारा पहिला जलदगती गोलंदाज आहे. इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. हा इंग्लंडकडून सर्वाधिक आणि सचिन तेंडुलकरनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त कसोटी सामने खेळलेला आहे. याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्येही सर्वाधिक (२६९) बळी घेतलेले आहेत. अँडरसन आणि ज्यो रूटची १९८ धावांची भागीदारी इंग्लंडसाठी शेवटच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी आहे. अँडरसन कसोट्यांमध्ये फलंदाजी करीत असताना विक्रमी ११४ वेळा नाबाद राहिला आहे.
उच्च फॉर्ममध्ये असतानाही २०२४मध्ये इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने अँडरसनला लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर निवृत्त करण्याची घोषणा केली
जेम्स अँडरसन
यामागील विज्ञान आणि इतिहास.