डोपामिन हे आपल्या मेंदूतील एक रसायन (nurotransmitor) आहे. कोणतीही नविन व आनंददायी गोष्ट केली की ते डोक्यात स्त्रवलं जातं. दैनंदिन जीवनात जेव्हा आपण कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपल्या मेंदूत डोपामिन आणि सेरोटोनिन हे दोन संप्रेरके स्त्रवतात. सबब नियमित दयाळूपणा आणि कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहे. आनंद देणारी आणि उल्हासित करणारी कोणतीही कृती 'डोपामाइन' स्रावित करण्यास चालना देते. चालणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, आवडते संगीत ऐकणे, नृत्य करणे, गाणे, ध्यान करणे किंवा उन्हात वेळ घालवणे—या गोष्टी डोपामाइनचा स्राव होण्यास मदत करतात. आपल्या शरीरातील डोपामाइनच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी, निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →डोपामिन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?