डोंगरी मैना

थोडक्यात पण महत्त्वाचे.

डोंगरी मैना

साधारणपणे २५ ते २७ सें. मी. आकाराचा डोंगरी मैना हा पक्षी मुख्यत्वे काळ्या रंगाचा असून याची चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात तसेच डोक्याच्या मागे डोळ्यापासून मानेवर एक पिवळा पट्टा असतो व हीच याची विशेष खूण आहे. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

डोंगरी मैना हा झाडांवर राहणारा (Arboreal) पक्षी असून तो उत्तम गाणारा, नकलाकार पक्षी असल्याने याला फार मोठ्या प्रमाणात पिंजऱ्यात ठेवले जाते. या कारणासाठी तो दुर्मिळ पक्षी होत आहे. मार्च ते ऑक्टोबर याचा वीणीचा हंगाम असतो. याचे घरटे गवत, पाने, विविध पिसे यांनी बनविलेले असते व ते जमिनीपासून साधारणपणे १० ते ३० मी. उंच झाडावर असते. मादी एकावेळी २-३ अंडी देते, ही अंडी गडद निळ्या रंगाची व त्यावर लाल-तपकिरी ठिपके असलेली असतात.

डोंगरी मैना हिमालयाच्या पायथ्याजवळील भागापसून पूर्वेकडील भाग, पूर्व आणि पश्चिम घाट प्रदेश आणि छोटा नागपूर, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान आणि निकोबार, श्रीलंका, बांगलादेश या भागातील सदाहरित आणि निमहरित वनात, डोंगरी भागात आढळतो. रंगात थोडा फरक असलेल्या याच्या काही उपजाती फिलिपाईन्स, दक्षिण-पूर्व आशिया, म्यानमार येथेही आहेत.

डोंगरी मैना छत्तीसगढराज्याचा राज्य पक्षी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →