कबरा गप्पीदास किंवा कवड्या वटवट्या(शास्त्रीय नाव: Saxicola caprata, सॅक्सिकोला कॅप्राटा ; इंग्लिश: Pied Bushchat, पाइड बुशचॅट ;) ही पश्चिम व मध्य आशियापासून दक्षिण व आग्नेय आशियापर्यंतच्या भूभागात आढळणारी जल्पकाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. हे पक्षी साधारणपणे १३ सें. मी. आकारमानाचे, चिमणीपेक्षा लहान असतात. यांतील नर आणि मादी वेगवेगळ्या रंगाचे असतात. नराच्या पाठीचा रंग काळा, पोटाचा भाग पांढरा आणि पंखावर पांढरा पट्टा असतो, तर मादी तपकिरी-तांबुस रंगाची असते.
कबऱ्या गप्पीदासाच्या शास्त्रीय नावातील सॅक्सिकोला या शब्दाचा अर्थ खडकाळ प्रदेशांत राहणारा असा होतो, तर कबरा हा शब्द काळा आणि पांढरा हे दोन रंग असलेल्या रूपासाठी योजला जातो.
कबरा गप्पीदास
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.