डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इ.स. १९६६ मधील लेखक धनंजय कीर लिखित भारतीय विद्वान आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी चरित्र आहे. हे पुस्तक आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल १९६६ रोजी मुंबईतील पॉप्युलर प्रकाशनाद्वारे पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आंबेडकरांचे हे एक उल्लेखनीय चरित्र आहे. आंबेडकरांच्या लेखनाची यादी, आंबेडकरांवरील लेखनाची यादी तसेच आंबेडकरांचा थोडक्यात जीवनपट या बाबींही पुस्तकात समाविष्ट आहे. या पुस्तकाचे इंग्रजी, हिंदी, जपानी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत.
कीर यांनी इ.स. १९५४ मध्ये आंबेडकरांचे इंग्रजी चरित्र "डॉ. आंबेडकर: लाईफ अँड मिशन" देखील लिहिले आहे, जे आंबेडकरांचे तिसरे चरित्र आणि पहिले इंग्रजी चरित्र आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९६६ चे पुस्तक)
थोडक्यात पण महत्त्वाचे.