डेलावेर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डेलावेर

डेलावेर (इंग्लिश: Delaware; डेलावेअर ) हे अमेरिका देशामधील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात वसलेले डेलावेर लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील ४५व्या क्रमांकाचे व सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

डेलावेरच्या पूर्वेला अटलांटिक महासागर व न्यू जर्सी, पश्चिमेला व दक्षिणेला मेरीलॅंड व उत्तरेला पेनसिल्व्हेनिया ही राज्ये आहेत. डोव्हर ही डेलावेरची राजधानी तर विल्मिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे. डेलावेरच्या एकूण क्षेत्रफळाच्या २२ टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.



७ डिसेंबर १७८७ रोजी अमेरिकेची स्थापना करणारे डेलावेर हे पहिले राज्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →