डिजीटल फोटोग्राफी ही एक आधुनिक फोटोग्राफीची पद्दत आहे. यात विध्युतपरमाणु वापरुण सर्व सुविधासह तयार केलेला कॅमेरा दुर्बिनेचे मदतीने शुक्ष्मतेने प्रतिमा शोधतो आणि पकडतो. त्यात पकडलेल्या प्रतिमांच्या तो अनेक प्रतिमा करू शकतो तसेच गणकयंत्राचे प्रणालीने फोल्डर मध्ये साठऊन ठेऊ शकतो. त्या प्रतिमा नंतर केव्हाही पाहता येतात, प्रशिद्द करता येतात व त्यांची छपाई ही करता येते.
जोपर्यंत फोटोग्राफीचे नवीण तंत्र येत नाही तोपर्यंत कागदावरील आणि फिल्म मध्ये प्रतिमा पाहाव्या लागणार आहेत की ज्या रासायनिक द्रावणात बुडंऊन त्या स्थिर केल्या जातात. डिजीटल कॅमेऱ्यातील प्रतिमा या अतिशय सुंदर बनतात, त्याला कारण म्हणजे गणक यंत्रातील तंत्राचा वापर करून यांत्रिक पद्दतीने त्या बनविल्या जातात त्यासाठी कोणत्याही रासायनिक द्राविक मिश्रणाचा अवलंब केलेला नसतो. डिजीटल फोटोग्राफी हा डिजीटल विविध प्रतिमा घडविण्याचा एक भाग आहे. फोटोग्राफीचे साधन न वापरताही संगणक टोमोग्राफी स्क्यानर आणि रेडियो टेलिस्कोपच्या सहाय्यानेही आता डिजीटल प्रतिमा बनवता येतात. अलीकडे कोणतीही छापील बाब किंवा निगेटिव्ज स्कॅन करून डिजीटल प्रतिमा बनविता येतात.
सन १९९० चे शेवटी शेवटी डिजीटल कॅमेरा प्रथम बाजारात आला. फोटोग्राफीचे व्यवसाइक सावधपणे या कॅमेऱ्याकडे वळले पण जेव्हा त्याचे अतिशय जलद आणि परफेक्ट रिझल्ट येऊ लागले तेव्हा ते अवाक झाले आणि ते पाहून मालक आणि ग्राहक सुधा पुर्वांपार चालत आलेल्या पिढीजात फोटोग्राफी पासून दूर झाले. सन २००७ मध्ये या डिजीटल कॅमेरा ने सेल फोन मध्ये प्रवेश केला आणि पुढील काळात तो इतका प्रसारीत झाला की तो प्रसारमाध्यमाशी जोडला गेला आणि मेल मार्फत मेसेज देऊ लागला. सन २०१० पासून या डिजीटल पॉइंट अँड शूट आणि डीएसएलआर (DSLR)ची मिररलेस डिजीटल कॅमेरा बरोबर स्पर्धा पाहावयास मिळते की जो प्रतिमेची त्या कॅमेऱ्यापेक्षा चांगल्या दर्जेदार प्रतिमा देतो आणि शिवाय हा लहान आकाराचा असल्याने वापरण्यास,बाळगण्यास डीएसएलआर (DSLR) पेक्षा सोपा आहे. पुष्कळ मिरर लेस कॅमेऱ्याची दुर्बिण बदलता येते व तांत्रिक पद्दतीने सहजसूंदरपणे प्रतिमा शोध घेण्याची कला अवगत करून त्यात सामावलेली आहे.
डिजिटल फोटोग्राफी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?