वन्यजीवन छायाचित्रण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वाइल्ड लाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा असा प्रकार आहे की त्याचा संबंध जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांच्या नैसर्गिक सवई हेरून त्या समजुन फोटोग्राफी करता येते. हा फोटोग्राफी प्रकार अधिक आव्हानात्मक आहे तसेच ही फोटोग्राफी करताना मजबूत तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. म्हणजेच फोटोग्राफी करताना फोटोग्राफरला त्या प्राण्यांची पुढे काय हालचाल होणार आहे याचा बरोबर अंदाज असला पाहिजे आणि त्यासाठी फोटोग्राफी करणाराचे हस्त कौशल्य अतिशय छान असले पाहिजे म्हणजेच मजबूत पकड, लक्षाच्या हालचालीवर तीक्ष्ण नजर, सावध पवित्रा, याची गरज आहे. उदाहरणार्थ कांही प्राणी समोर येताना दबकतात किंवा कांही समोर येणे कठीण असते तेव्हा त्यांच्या सवयीचा अभ्यास असला पाहिजे तसेच त्यांच्या हालचालीचा अंदाज घेऊन पुढील कार्यवाही बाबत तत्पर निर्णय घेता आले पाहिजेत. प्राण्यांच्या पर्यंत दबकत कसे जावे, वस्त्रे कोणती असावीत, काय लपवावे, कोठे लपावे या सर्व बाबींचा अभ्यास असला पाहिजे. कांही फोटोग्राफी संबंधाने विशेष आयुधे आवस्यक असतात. कीटकांची फोटोग्राफी करताना मायक्रो लेन्स,पक्ष्यांची फोटोग्राफी करताना दूर पल्याच्या लेन्स आणि पाण्यातील जीवानुंची फोटोग्राफी करताना पाण्यात वापरावयाचा कॅमेरा आवश्यक असतो. योग्य ठिकाणी योग्य वेळेला पोहचुन फोटोग्राफी करणे हे चांगल्या फोटोग्राफीचे यश म्हणता येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →