डाउरी अँड इनहेरिटन्स (पुस्तक)

या विषयावर तज्ञ बना.

डॉवरी अँड इनहेरिटन्स हे पुस्तक स्त्रीवादी मानववंशशास्त्रज्ञ व समाजशास्त्रज्ञ श्रीमती बसू यांनी संपादित केलेले आहे. स्त्रियांवर विविध स्वरूपात होणारी हिंसा या मुद्यांवर भारतातील स्त्रीवाद्यांची अनेक मतमतांतरे व शोधनिबंध आहेत. या शोधनिबंधांचे संकलन या पुस्तकामध्ये केलेले आहे. हे पुस्तक, भारतातील विविध स्त्रीवाद मांडणारे बहुविध आवाज त्यांच्या भिन्नत्वासह एकत्र मांडण्याचा उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या इश्यूज इन कॉन्टेम्पररी इंडियन फेमिनिझम या मालिकेचा तिसरा खंड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →