ट्रुइस्ट पार्क हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून अंदाजे १६ किमी १० मैल) वायव्येस, कॉब काउंटी मध्ये आहे. ट्रुइस्ट पार्क मेजर लीग बेसबॉलच्या अटलांटा ब्रेव्ह्सचे घरचे मैदान बॉलपार्क आहे.
हे मैदान बांधण्यासाठी ६२ कोटी २० लाख डॉलरचा खर्च आला. यातील सुमारे ४४ कोटी डॉलर सार्वजनिक कर उत्पन्नातून भरून काढले गेले याशिवाय इतर खर्च धरता या मैदानाचा एकूण खर्च १.१ अब्ज डॉलर इतका आला. यांपैकी अटलांटा ब्रेव्ह्स ३० वर्षांमध्ये १८ कोटी व्याज भरतील.
ट्रुइस्ट पार्क
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?