ट्रांझिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (टेस) (Transiting Exoplanet Survey Satellite; TESS) ही नासाची एक्प्लोरर्स प्रोग्रॅम अंतर्गत आगामी अंतराळ दुर्बीण आहे. ही दुर्बीण संक्रमण पद्धतीने नवीन परग्रह शोधण्यासाठी बनवण्यात आली आहे. ती केल्पर दुर्बिणीपेक्षा ४०० पट मोठ्या क्षेत्राचे सवेक्षण करेल.
टेस मोहिमेचा मुख्य उद्देश सूर्याजवळील प्रखर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेणे हा आहे. यासाठी ही दुर्बीण दोन वर्ष किंवा अधिक काळासाठी सूर्याभोवतीच्या तेजस्वी ताऱ्यांचे सर्वेक्षण करेल. टेसमधील आधुनिक कॅमेरे अतिशय संवेदनशील आणि विस्तृत दृश्य क्षेत्राचे असून त्यामुळे अनेक लहान परग्रह शोधता येतील. त्याचबरोबर त्यांचे वस्तुमान, घनता, कक्षा आणि आकार मोजता येईल. विशेषतः ताऱ्यांच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रातील खडकाळ ग्रह शोधता येतील. टेस दुर्बीण ही जेम्स वेब अवकाश दुर्बीण आणि जमिनीवरील भविष्यातील इतर दुर्बिणींना सखोल अभ्यासाठी नवीन लक्ष्य पुरवेल. टेसला १८ एप्रिल २०१८ रोजी फाल्कन ९ प्रक्षेपकातून प्रक्षेपित करण्यात आले.
ट्रांझिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.