टोयोटा (जपानी: 豊 田 市) हे जपानमधील आयची प्रीफेक्चर (प्रांत) मधील एक शहर आहे. १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शहराची अंदाजे लोकसंख्या ४,२६,१६२ आणि लोकसंख्येची घनता ४६४ माणसे प्रति चौरस किमी आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ९१८.३२ चौरस किमी (३५४.५७ चौ. मैल) आहे. हे नागोयापासून मीटेत्सू टोयोटा लाइनमार्गे सुमारे ३५ मिनिटांवर आहे.
टोयोटा मोटार कॉर्पोरेशनचे अनेक उत्पादन प्रकल्प येथे आहेत. त्यातील महत्वाचा सुत्सुमी प्रकल्प देखील येथे आहे. टोयोटा मोटार कॉर्पोरेशन आणि टोयोटा शि शहर यांच्यात असलेल्या संबंधांमुळे या शहराला त्याचे वर्तमान नाव देण्यात आले. याचे पूर्वीचे नाव कोरोमो होते.
टोयोटा (आयची)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.