कासुकाबे (सैतामा)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कासुकाबे (सैतामा)

कासुकाबे (जपानी: 春日部市, रोमन लिपी: Kasukabe) हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमध्ये स्थित एक विशेष दर्ज्याचे शहर आहे. १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत, शहराची अंदाजे लोकसंख्या १०८,३०८ कुटुंबांमध्ये एकूण २३३,२७८ होती आणि लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर ३५०० व्यक्ती होती. शहराचे एकूण क्षेत्रफळ ६६.०० चौरस किलोमीटर (२५.४८ चौरस मैल) आहे. कासुकाबे हे किरी-तानसू (桐箪笥), पारंपारिक तानसू ड्रेसर्सच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, जे पाउलोनिया लाकडापासून बनवले जाते. पाउलोनिया झाड आर्थिक आणि सांस्कृतिक द्रुष्ट्या मूल्यवान आहे. ते शहराचे "अधिकृत शहर वृक्ष" म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →