टोमॅटो ही एक फळभाजी आहे. मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटीशकाळात टोमॅटोला 'तांबेटे' असेही म्हणले जात. संस्कृतमध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात.
यातील मुख्य पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि लायकोपीन. टोमॅटोत थोड्या प्रमाणात कैल्शियम, व फास्फोरस असते. टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे शरीरात व्हिटॅमिन A मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांसाठी लाभदायी ठरते. यातील स्वाद आंबट (अम्लीय) असला तरी शरीरात क्षारीय प्रतिक्रिया निर्माण करतो. आंबट चवीचे कारण यात असलेले साइट्रिक व मॅलिक आम्ल आहे. टोमॅटोतील प्रमुख रंगद्रव्य म्हणजे लायकोपीन. लाल टोमॅटोमध्ये हे प्रामुख्याने all-trans स्वरूपात असते, जे शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते; तर नारिंगी टोमॅटो किंवा प्रक्रियायुक्त टोमॅटोमध्ये cis-lycopene स्वरूप असते, जे शरीरात सहज शोषले जाते.
टोमॅटो
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.