टेरी लिन हॅचर (जन्म ८ डिसेंबर १९६४) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. ती लोइस अँड क्लार्क: द न्यू ॲडव्हेंचर्स ऑफ सुपरमॅन (१९९३-९७) आणि डेस्परेट हाऊसवाइव्हज (२००४-१२) या दूरचित्रवाणी मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. जेम्स बाँड चित्रपट टुमॉरो नेव्हर डायज (१९९७), कोरलाइन (२००९) या चित्रपटांमध्ये पण ती दिसली. डेस्परेट हाऊसवाइव्हज मधील सुसान मायरच्या कामासाठी तिने म्युझिकल किंवा कॉमेडीमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स मिळावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेरी हॅचर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.