टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

या विषयातील रहस्ये उलगडा.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (स्थापना इ.स. १९२१) हे पुणे शहरातील एक विद्यापीठ आहे. इ.स.१९८७मध्ये भारत सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. हे विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.

विद्यापीठात हॉटेल व्यवस्थापन, फिजिओथेरपी, मास मीडिया, कायदा, रुग्णशुश्रूषा, भारतविद्या (इंडॉलॉजी), वृत्तपत्रविद्या, संगणक शास्त्र, जपानी-जर्मन-संस्कृत-इंग्रजी भाषाया विषयांचे पदविका/पदवी इत्यादी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →