टिनटिन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टिनटिन

टिनटिन (मूळ फ्रेंच भाषेतील उच्चार: तॅंतॅं) हा टिनटिनच्या साहसकथा (फ्रेंच: Les Aventures de Tintin) या बेल्जियन काल्पनिक चित्रकथेचा नायक आहे. बेल्जियन चित्रकथाकार एर्जे याने ही व्यक्तिरेखा रेखाटली आहे. टिनटिन हा पेशाने पत्रकार आहे. मीलू (चित्रकथेच्या इंग्लिश आवृत्तीत स्नोई) नामक आपल्या पाळीव कुत्र्यास सोबत घेऊन तॅंतॅं जगभर फिरत असताना त्याने केलेल्या साहसी कामगिऱ्या या चित्रकथांमध्ये रंगवल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →