टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.
शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्त देशांच्या गटात सामील होऊन टांझानियाने भारताच्या बरोबरीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. टांझानियाचे पूर्वराष्ट्राध्यक्ष स्व. म्वालीमु ज्युलिअस न्यरेरे आणि भारताच्या पूर्वपंतप्रधान स्व. इंदिरा गांधी ह्या दोघांमधे जवळचे राजकीय संबंध होते.
इ.स. १९६०च्या सुमाराला युगांडा देशातल्या इदी अमिन ह्या क्रूर हुकूमशहाने जेव्हा भारतीय मूळवंशी जनतेची त्या देशातून हकालपट्टी केली होती तेव्हा स्व. म्वालीमु जुलिअस न्यरेरे ह्यांनी त्या जनतेला टांझानिआत आसरा दिला होता.
डिसेंबर इ.स. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी (चामाचा मापिंदुझी-CCM) पक्षाचे श्री.जकाया किक्वेते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
टांझानिया
थोडक्यात पण महत्त्वाचे.