टांगानिका (रोमन लिपी: Tanganyika ;), उत्तरकाळातील टांगानिकाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: टांगानिक्याचे प्रजासत्ताक ; इंग्लिश: Republic of Tanganyika, रिपब्लिक ऑफ टांगानिका) हा पूर्व आफ्रिकेतील इ.स. १९६१ ते इ.स. १९६४ या कालखंडात अस्तित्वात असलेला एक देश होता. हिंदी महासागर व व्हिक्टोरिया सरोवर, मालावी सरोवर, टांगानिका सरोवर या आफ्रिकेतील मोठ्या सरोवरांनी वेढलेल्या या देशात वर्तमान रवांडा, बुरुंडी व झांझिबार वग़ळता टांझानियाच्या उर्वरित भूभागाचा समावेश होता, तर दार एस्सलाम येथे टांगनिक्याची राजधानी होती.. भूतपूर्व जर्मन पूर्व आफ्रिकेच्या वसाहतींना ९ डिसेंबर, इ.स. १९६१ रोजी स्वातंत्र्य मिळून या देशाची स्थापना झाली. २६ एप्रिल, इ.स. १९६४ रोजी या देशाचे विसर्जन झाले व याच्या भूभागात झांझीबाराचे सामिलीकरण होऊन वर्तमान टांझानियाचे प्रजासत्ताक स्थापले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टांगानिका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!