झिम्बाब्वे पुरुष क्रिकेट संघाने मे २०२४ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात मूळतः दोन कसोटी तसेच पाच टी२०आ सामने होते. तथापि, मार्च २०२४ मध्ये, कसोटी मालिका २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. टी२०आ सामने बांगलादेशच्या २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा एक भाग बनले. मार्च २०२४ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली. मालिकेच्या शेवटी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू सीन विल्यम्सने टी२०आ क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२४
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!