वीरांगना झलकारीबाई कोळी (२२ नोव्हेंबर १८३० - ४ एप्रिल १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला. पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली. झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.
झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके बुंदेलखंडातील लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य, याची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली.
झलकारीबाई
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.