झंझ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

महाराष्ट्रात शिलाहार वंशाचे राज्य होते. इसवी सनाच्या ९१०-९३० या काळात शिलाहार वंशामध्ये झंझ नावाचा राजा होऊन गेला. हा राजा शंकराचा भक्त होता. त्याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती अशी :-



कडवा नदीकिनारी असणाऱ्या टाकेद येथील शिवालय.

कुकडी नदीजवळ असणारे कुकडेश्वर.

कोटेश्वर, भोरगिरी किल्ला

घोड नदीवरील वचपे येथील सिद्धेश्वराचे देऊळ.

त्र्यंबकेश्वर येथे अहिल्यातीर्थाजवळ असणारे भग्न शिवमंदिर.

धारणा नदीच्या तीरावरील तऱ्हले येथील शिवालय.

प्रवरा नदीकिनारी असणारे, रतनगडच्या पायथ्याचे रतनवाडी येथील अमृतेश्वर.

बाम नदीकिनारी असणाऱ्या बेळगाव या गावामधील पुरातन शिवालय.

मीना नदीवरील पारुंडे या गावातले ब्रम्हनाथ मंदिर.

मुळा आणि पुष्पावती या दोन नद्यांच्या दरम्यान खिरेश्वर या गावातील सुप्रसिद्ध नागेश्वर. (ही मुळा नदी अहमदनगर जिल्ह्यातली नदी आहे, पुण्यातली मुळा नाही)

वाकी नदीच्या उगमस्थानावर (इगतपुरी) येथे असलेल्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याचे शंकराचे शिवालय.

जिथून मंगलगंगा नदी उगम पावते, तेथील.हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →