ज्ञानेश महाराव

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ज्ञानेश महाराव हे मराठी साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक आहेत. ते १९८५ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८५ ते १९८९ सालापर्यंत "विवेक" या मराठी साप्ताहिकाचे सहाय्यक-संपादक होते. जून १९८९ पासून आजपर्यंत ते मराठी साप्ताहिक "चित्रलेखा"चे संपादक म्हणून काम बघत आहेत. त्यांनी २० पेक्षा अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. परखड लेखक, वक्ते - व्याख्याते अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयांवर सडेतोड लेखन केले आहे.

लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झालेल्या ४ थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →