ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही पुण्यातील सदाशिव पेठेतील एक माध्यमिक शाळा आहे. ही शाळा डॉ. विनायक विश्वनाथ उर्फ अप्पा पेंडसे ह्यांनी सुरू केली. ही शाळा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते.
ह्या शाळेत ५वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात..
शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात.
शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात.
याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात.
ज्ञान प्रबोधिनी प्रशाला
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.