ज्ञान प्रबोधिनी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ज्ञान प्रबोधिनी

ज्ञान प्रबोधिनी ही पुण्यातील एक समाजसेवी संस्था आहे. कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे.

ज्ञान प्रबोधिनी ही नेतृत्व विकसनासाठी स्थापन झालेली संस्था असून, शिक्षण, संशोधन, ग्राम विकास, आरोग्य व युवा संघटन, स्त्री-शक्ती-प्रबोधन या क्षेत्रात काम करते. ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा पुणे, निगडी, सोलापूर, हराळी, आंबेजोगाई येथे आहेत. निगडी येथील शाळेमध्ये गुरुकुल आणि क्रीडाकुल असे विभाग कार्यरत आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली येथे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →