बहिरवाडी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बहिरवाडी हे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं, सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी वेढलेले अकोले तालुकातील एक लहानसा आदिवासी खेडे आहे. अवघ्या हजारभर लोकवस्तीचे हे गाव. १९४८ साली प्राथमिक शाळेच्या रूपाने गावात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एक शिक्षकी शाळा सुरू झाली. ही शाळा गावातल्या देवळात भरायची. याच शाळेने येथील माणसांना अक्षरांची ओळख करून दिली. पिढ्यान-पिढया काळ्या मातीत राबणाऱ्यांच्या पंखांना बळ दिलं. त्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेतली. गावात सुधारणाचे वारे वाहू लागलं तसं गावकऱ्यांच्या सहभागातून शाळेचं रूप हळूहळू बदलत गेलं.

१०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती असलेल्या या शाळेने आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवलं आहे. काळ बदलला तसे शिक्षणाचे संदर्भही बदलले. शाळाही बदलते आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →